क्रिकेट स्पर्धेत सनराईज योगा ग्रुप विजेता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मराठा रायडर क्लब, गडचांदूर यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यात सनराईज योगा ग्रुप विजेते पद पटकावून उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे मन जिंकले.
गेल्या एक महिन्यापासून सर्व महिला खेळाडूंनी सातत्याने सराव केला. घरकाम, चुल-मुलं सांभाळूनही त्यांनी चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मैदानात उतरून शानदार खेळ सादर केला. चंद्रपूर महिला क्रिकेट टीम सोबत झालेल्या या सामन्यात सनराईज ग्रुपच्या माहिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशामागे सनराईज ग्रुपच्या संचालिका कुंतल चव्हाण अध्यक्षा सौ. सुरेखा ठाकरे, डॉ. कृष्णा ठाकरे वैशाली पारधी, अर्चना घोटकर, भारती राठोड, माधुरी चुधरी, पल्लवी सोंनटक्के, पल्लवी रोहणे, संध्या मडावी, पल्लवी इंगोले अनिता केराम आणि छाया बीजे आर्या चुधरी वंदना राठोड अंजु बिस्वास सुषमा चापले आदी सर्व सदस्यांचे मोलाचे योगदान आहे.तसेच गेल्या एक महिन्यापासून क्रिकेट कोच म्हणून श्री. कृष्णा जाधव यांनी संपूर्ण टीमवर विशेष मेहनत घेतली. त्यांच्या मार्गदर्शन, शिस्त आणि योग्य प्रशिक्षणामुळे संघ अधिक सक्षम बनला आणि ही कामगिरी शक्य झाली.
सर्वांना सतत प्रोत्साहन आणि पाठबळ देण्यासाठी सनराईज ग्रुपच्या कुंतल चौहान मॅडम यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. महिलांसाठी त्यांचे नेहमीच सकारात्मक आणि प्रेरणादायी मार्गदर्शन संघासाठी ऊर्जा देणारे ठरले.सर्वांच्या एकजुटीने, मेहनतीने आणि पाठिंब्याने हा अभिमानास्पद क्षण साकार झाला. सनराईज ग्रुपच्या सर्व महिला खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



