महात्मा गांधी महाविद्यालय येथे वीर बाल दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदुर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या निर्देशानुसार 26 डिसेंबर हा दिन वीर बाल दिवस म्हणून संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरा केला.
शीख धर्माचे दहावे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग जी यांच्या चार सुपुत्रांच्या शहादत दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. इंग्रजाच्या विरोधात उभारलेल्या लढ्यात चारही बालवीरानी आपल्या प्राणाची आहुती दिली. ते बालवीर म्हणजे अजित सिंह, जुझार सिंह, जोरावर सिंह व फतेह सिंह होत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण भारतात 26 डिसेंबर वीर बाल दिवस साजरा करण्याचे शासनातर्फे आवाहन केले गेले.
महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली केले होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. चेतन वैद्य यांनी केले. मुख्य अतिथी म्हणून डॉ. अजयकुमार शर्मा व डॉ. संदीप घोडिले उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला व चार साहिबजादे हा चित्रपट बघण्यास प्रोत्साहित केले.



