ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक 

बैठकीत अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यानी केला प्रवेश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या(अज) वतीने कार्यकर्ता आढावा बैठक व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, प्रदेश सचिव सय्यद अबीद अली, महिला जिल्हाध्यक्षा रंजनाताई पारशिवे तसेच मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते या बैठकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला.

जिवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय लक्ष्मणराव गोतावळे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्यात आला. यावेळी आरीफ शेख (डोंगरे ) यांची अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संजय रामकिसन भालेराव, किसन, शंकर गोतावळे, विठ्ठल किसन राठोड, संजय गोविंद राठोड, सटवा मोतीराम भालेराव, गजानन गंगाधर चव्हाण, रमेश जाधव, मधुकर बसवंते, धनाजी पंढरी कांबळे, सूर्यकांत एकनाथ गायकवाड, शेषपाल गायकवाड, हनुमंत तोगरे, वसंत पट्टेवाले, बालाजी वाघमारे, वैजनाथ घोसे, परमेश्वर राठोड, देवबा मेंढे, परसराम खोकले, किसन मेंढे, दत्ता बुरकुले, बाजीराव हाळसे, पंडितराव खंदारे, उत्तम गुहाडे तसेच महिलांनी पक्षप्रवेश घेतला.महिला तालुका अध्यक्ष म्हणून अंजनाताई बुरकुले यांची निवड करण्यात आली.

यशोदाबाई केंद्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सखुबाई मेंढे, भिमाबाई डुडुळे, शशिकलाबाई मेंढे, यशोदाबाई खोकले, ललिताबाई झिंगरे, भिवराबाई बुरकुले, अशा अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच प्रफुल पटेल तसेच प्रदेशाचे अध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, अबिदअली, रंजनाताई पारशीवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ भटारकर, प्रदेश सचिव आबिदअली, जिल्हा महिला अध्यक्षा रंजनाताई पारशिवे, मेश्राम, शब्बीर जागीरदार, बालाजी पूल्लेवाड, गणेश जाधव, आरीफ डोंगरे, उद्धव गोतावळे, गणेश कांबळे, बबलू सय्यद, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये