ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथील शहीद वीर बाबुराव शेडमाके स्मारकास भेट देण्याबाबत हंसराज अहीर यांनी दिले महामहिम राष्ट्रपतींना निमंत्रण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पुर्व अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी महामहिम माननीय राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली व शहीद वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या जयंती अथवा पुण्यतिथी निमीत्त चंद्रपूर येथील स्मारक स्थळावर होणाऱ्या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबाबत स-सन्मान आमंत्रीत केले.

हंसराज अहीर यांची सन 2022 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी माननिय राष्ट्रपती द्वारा नियुक्ती करण्यात आली होती. या संवैधानिक पदाचा 3 वर्षाचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झाल्याबद्दल अहीर यांनी सदर भेटी प्रसंगी माननिय राष्ट्रपती महोदयांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये