तेलंगणा स्टेटमध्ये संजय वैद्य श्री गुरुदेव उत्कृष्ट समन्वयक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वरोरा येथील रहिवासी, युवा सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य संजय वैद्य यांना दिवंगत किसन वडस्कर स्मृती श्री गुरुदेव उत्कृष्ट समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२० आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन गोयेगाव जि. आसिफाबाद (तेलंगणा स्टेट) येथे नुकतेच संपन्न झाले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष एड. पारोमिता गोस्वामी, उद्घाटक आम. कोवा लक्ष्मी, परिषदेचे चिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, उपाध्यक्ष विलास उगे, श्रीकांत धोटे, अर्जुन पारुडकर यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या वीस वर्षांपासून श्री. संजय वैद्य हे सामाजिक , सांस्कृतिक व धार्मिक कार्यात असून आजवरच्या साहित्य परिषदेच्या संमेलनाचे नियोजन आयोजन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे.
सुरुवातीला १९९९ मध्ये त्यांनी नांदगाव (पोडे) या ठिकाणी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेची सांस्कृतिक शाखा उघडली होती. तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व, वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजात रूजवण्यासठी प्रयत्न करीत आहे, हे विशेष. पुरस्कार मिळाल्याबद्दल परिषदेचे डॉ. श्रावण बानासुरे, धम्म मित्र नामदेव गेडकर, विनायक साळवे, विलास चौधरी, प्राचार्य भाऊ पत्रे, देवराव कोंडेकर, एड. सारिका जेनेकर, ग्राम. नामदेव मोरे, नामदेव पिज्दूरकर, गणेश मांडवकर, भाऊराव बोबडे यांनी अभिनंदन केले आहे.


