ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडवाना विद्यापीठस्तरिय रस्सीखेच स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय विजयी

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या व मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय अजिंक्यपद पटकाविले आहे. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धा आर. टी. एम. महाविद्यालय, चिमूर येते आयोजीत करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला.

या रस्सीखेच स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने सलग पाचव्या वर्षी अजिंक्यपद पटकाविले. विजेते पद खेचून आणण्याकरिता मुलांच्या संघात शिवम हमंद, प्रेम वाघमारे, द्विज हेडाऊ, शिवम तिवारी, अरिहंत यादव, फरदिन खान, दीपक कडूकर, शुभम पवार, श्रवण मेश्राम, गौरव धकाते यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले. तसेच मुलींच्या संघाने सलग चौथ्या वर्षी अजिंक्यपद पटकाविले. विजेते पद खेचून आणण्याकरिता मुलींच्या संघात आरुषी डोईजड, श्रेया राऊत, आयूषी देबनाथ, जानवी निवलकर, कल्याणी सोंटके, स्वीटी विधाते, ऋतुजा लेनगुरे, रमा यादव, संजीवनी वर्मा, सलगम गुप्ता यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेडीवार कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तिवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल सावलीकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संतोष कुमार शर्मा, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंत डभारे, आदित्य मंगरूळकर, प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केल.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये