ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार मा. किर्तीकुमार भांगडीया यांच्या मार्गदर्शनात बंद्रपुर जिल्हा बँकेचे कार्य प्रगतीपथावर

पुणे येथे राज्याचे सहकार आयुक्त मा. दिपक विमल रामचंद्र तावरे यांची सदीच्छा भेट

चांदा ब्लास्ट

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री रविंद्र श्रीनिवासराव शिदि यांचेसह बैंक संचालकांनी मा. दिपक विमल रामचंद्र तावरे सहकारी आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था पुणे महाराष्ट्र राज्य यांनी दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. भेटी दरम्यान आदरणीय आमदार किर्तीकुमार भांगडीया पांचे मार्गदर्शनात सुरु असलेल्या बँकेच्या कार्यायावत व प्रगतीचावत सविस्तर माहिती मा. सहकार आयुक्त यांना अवगत केली त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली गर्ने दरम्यान बँकेच्या जिल्हयात ८२ शाखा व १९ पै. ऑफीस असुन बँकेला ३९२ शेतकी संरभाव ८५ पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था सलग्न आहेत. बँकेकडुन शेतकी संस्थामार्फत खरीप हंगाम २०२५-२६ करीता ७३८ कोटी पिककर्ज वाटप केलेले आहे. पिककर्ज वाटपात जिल्हयात बैंक प्रथम स्थानावर असून पिककर्जाचे लक्षांक पूर्ण करणारी जिल्हयातील एकमेव बैंक आहे. पिककर्जासोबत शेतकन्यांना सिंचनाकरीता व शेती उपयोगी अवजाराकरीता व दुग्धपालन, मत्स्यपालन व्यवसायाकरीता कर्ज वाटप करीत असते. सद्यास्थितीत बँकेकडे ४०९० कोटी ठेवी असून रु.५ लाखापर्यंत शासन विमा योजने अंतर्गत ठेवीदारांना संरक्षण असल्याची माहिती देण्यात आली. सोबतच बचतगटाच्या कार्यात जिल्हयात बैंक अग्रेसर असून बँकेला २३.९३३ बचत गट संलग्न आहेत. मालु वर्षांत ६.३५६ बचत गटांना १६५ कोटीचे कर्ज वितरण केले आहे. बचतगर कर्ज वसुली ११ टक्के असून जिल्हयातीत २,५०,५०० महिला बचत गटाच्या माध्यमातुन बँकेशी जुळलेल्या आहेत. बँकेनी २५०७ कोतीचे कर्ज वितरण केलेले असून बँक स्वः निधीतुन कर्ज वाटप करीत असते. बँकेमार्फत व्यावसायिक, पगारदार कर्मचारी यांना घेत कर्ज वितरण केले जाते यात कॅश क्रेडीट कर्ज, वैयक्तिक पत कर्ज घरबांधणी कर्ज, वाहन खरेदी कर्ज उच् शिक्षण कर्ज समावेश आहे.

बैंक आपल्या ग्राहकांना लॉकर सुविधेसह सोनेतारण कर्ज वितरीत करीत असतं. बँकेच्या ठेवीदारांना बैंक गॅरंटी, सालवन्ती या सुविधा उपलब्ध करुन देत आहे. अशी माहिती मा. सहकार आयुक्त याना देण्यात आली. भेटी दरम्यान मा. सहकार आयुक्त यांना बँकेमार्फत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखीत ग्रामगिता व सन्मानाची भगवी टोपी देऊन सत्कार करण्यात आला. व बँकेला भेट देण्याची विनंती करण्यात आली.

याप्रसंगी मा. सहकार आयुक्त यांनी बँकेच्या उत्कृष्ट कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करुन भविष्यात सहकार विभागाकडून मार्गदर्शन आणि पाठबळ देण्यात येईल असे उद्‌देशून बँकेला भेटी संदर्भात अनुकुलता दर्शविली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष श्री. रविंद्र श्रीनिवासराव शिंदे, बैंकोचे उपाध्यक्ष श्री. संजय गुलाबराव डोगरे, श्री. सुदर्शनजी निमकर संचालक तथा माजी आमदार, व संचालक श्री. रोहित बोम्मावार, श्री. आवेश खान पठाण, श्री. जयंता रेमुर्दे, श्री. दिनेश गोखारे, श्री. गणेश तर्वेकर, श्री. विजय बावणे, श्री. निशिकांत बोरकर यांचेसह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश्वर भि. कल्याणकर हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये