आज कामगारांचा देशव्यापी संप, भाकपा (माले ) पक्षाच्या वतीने निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : देशव्यापी संपाचे कारण असे की देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे.सार्वजनिक उद्योगाची दिल्लीच्या व मुंबईच्या सरकारने पूर्ण वाट लावली.तसेच केंद्र सरकारने नवीन कायदे आणलेले आहेत ते कायदे कामगार विरोधी आहेत. त्या कायद्यामुळे कामगार वर्ग असुरक्षित झालेला आहे तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार च्या क्षेत्रातील नोकर भरती गेल्या दहा वर्षापासून करण्यात आलेली नाही .जी नोकर भरती करण्यात येत आहे ती सुद्धा कामगार कायद्यानुसार संविधानिक आहे.

कंत्राटी कंपनीला कामगार भरती करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता जी नोकर भरती केल्या जाणार आहे ती नोकर भरती कंत्राटी असेल कंत्राटी कंपनीला आरक्षणाचा नियम लागू होत नाही. कंत्राटी कंपनी कामगारांचा जीपीएफ ,सीपीएफ विमा कापत नाही त्यामुळे कामगारांचे आयुष्य धोक्यात आलेले आहे .जो कामगार वर्ग आयुष्यभर जनतेला सरकारमार्फत सेवा देतो त्या असंघटित व मानसेवी कामगार वर्गाला पेन्शन मिळत नाही. त्यामुळे कामगार वर्गाचे पुढील आयुष्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळेच देशातील सर्व कामगार संघटनांनी 12 फेब्रुवारी रोजी संप करणार असल्याचे आवाहन सरकारला केले होते.
या संपात देशभरातील जवळपास 30 कोटी कामगार संपावर गेलेले आहेत .या संपात शेतकऱ्यांच्या संघटना सुद्धा सहभागी झालेले आहेत. ऑल इंडिया या कामगार संघटनेचा वर्धा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ,शालेय पोषण आहार देणाऱ्या महिला, बँक विभागातील कामगार यांना संपावर जाण्याची आवाहन करण्यात आले होते. त्यास महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक राजू गोरडे यांनी आवाहन केले होते. त्यास जिल्ह्यातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांनी प्रतिसाद दिला .दिनांक 12 फेब्रुवारी रोजी ए आय सी सी टी यु या कामगार संघटनेच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी व राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना निवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिष्टमंडळातील कामगार संघटनेतील प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात आली. यावेळी प्राध्यापक राजू गोरडे, मनोहर पंचारिया ,प्राध्यापक राजेंद्र जिभकाटे ,जितेंद्र गोरडे, नितीन सुळे, पद्माकर कांबळे ,शेख नजीर शेख , संजय देसाई ,राजू तेलतुंबडे,अविनाश नागदेवे,हसीना गोरडे ,चंद्रशेखर भेंडे ,प्राध्यापक राजेंद्र बानमारे,राजू भगत, कॉम्रेड राजू डांगे,सचिन डहाके,यांच्यासह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.



