ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकात्म मानववादाचा दीप सदैव प्रज्वलित राहील – आ. जोरगेवार

पंडित दीनदयाल उपाध्याय पुण्यतिथीनिमित्त जनसंपर्क कार्यालयात अभिवादन

चांदा ब्लास्ट

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी महानगराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

           या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, मनपा गट नेते चंद्रशेखर शेट्टी, महामंत्री सविता दंढारे, महिला महामंत्री सायली येरणे, विधानसभा महिला अध्यक्ष वंदना हातगावकर, नगर सेविका अॅड. सारिका संदुरकर, नगर सेवक रॉबिन बिश्वास, प्रविण गिलबिले, मंजुशा कासनगोट्टूवार, प्रलय मशाखेतरी, ताहिर हुसेन, शंकर दंतुलवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

          यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानववाद हा विचार आजही समाजजीवनाला दिशा देणारा आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून सर्वसमावेशक विकास साधणे, ही त्यांची भूमिका आजच्या काळात अधिकच महत्त्वाची ठरते.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रनिष्ठा, साधेपणा आणि समर्पित कार्यशैली यांचा आदर्श पंडितजींनी आपल्या आयुष्यातून घालून दिला. त्यांच्या विचारसरणीने भारतीय राजकारणाला नवी दिशा दिली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प आपण केला पाहिजे असे ते म्हणाले. या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याचा गौरव करत आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमात भाजपा महानगरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये