ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूरचा दुहेरी गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लखमापूर ने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केली असून *खेलो इंडिया स्पर्धेत ज्योत्स्ना मडावीचा राज्यस्तरीय सहभागा* बद्दल विभागीय समिती आणि *शिक्षणाधिकारी मान अश्विनी सोनवणे मॅडम यांनी शाळेचा सत्कार केला.

लखमापूर शाळेने अलीकडेच दोन महत्त्वपूर्ण यश मिळवून जिल्ह्याचा अभिमान वाढविला आहे.

 सुंदर शाळा या उपक्रमातील निरीक्षण

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत नागपूर विभागीय मूल्यांकन समितीने शाळेला भेट देऊन सखोल माहिती, निरीक्षण व पडताळणी केली. समितीत शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर, सहाय्यक शिक्षण उपसंचालक दीपेंद्र लोखंडे साहेब, उपशिक्षणाधिकारी नाट साहेब EO माध्यमिक मान शिनगुरे मॅडम, तसेच विभागीय कार्यालय नागपूरचे लिपिक सतिश शेंडे उपस्थित होते.

या वेळी जिल्हा परिषद चंद्रपूर शिक्षणाधिकारी मान अश्विनी सोनवणे मॅडम, उपशिक्षणाधिकारी मान विशाल देशमुख साहेब, गटशिक्षणाधिकारी कोरपना मान .कल्याण जोगदंड साहेब यांनीही सहभाग घेतला. समितीने शाळेतील सुविधा, शैक्षणिक उपक्रम व व्यवस्थापन पाहून समाधान व्यक्त केले.

 शाळेत राबवत असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सखोल माहिती घेऊन स्तुतीसुमने उधळली…*Great शब्दां मुळे शाळेतील सर्व टीमला नवी ऊर्जा मिळाली…

 खेलो इंडिया मधील कामगिरी

शाळेची विद्यार्थिनी कु.ज्योत्स्ना संदीप मडावी हिने खेलो इंडिया स्पर्धेत गोलफेक क्रीडा प्रकारात राज्यस्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विभागीय उपसंचालक मान.सावरकर मॅडम, मान शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे मॅडम, उपशिक्षणाधिकारी मान नड साहेब, मान.देशमुख साहेब, गटशिक्षणाधिकारी मान जोगदंड साहेब, विस्ताराधिकारी मान कोहपरे साहेब, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विनोद क्षीरसागर सर यांनी सत्कार करून गौरव केला.

या कार्यक्रमाला व्यवस्थापन समिती,अध्यक्ष मोरेश्वर जोगी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष अमित आवारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य मंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 या उपक्रमातील प्रगती आणि खेलो इंडिया मधील ज्योत्स्नाची कामगिरी या दुहेरी यशामुळे लखमापूर शाळेचा गौरव संपूर्ण जिल्ह्यात पसरला आहे. शाळेच्या प्रयत्नांना व विद्यार्थ्यांच्या उत्साहाला सर्व मान्यवरांनी दाद दिली असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सर्व शाळेच्या यशामागे उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य एक अभ्यासू नेतृत्व म्हणजे आमचे गटशिक्षण अधिकारी मान जोगदंड साहेब यांचे मार्गदर्शन व बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मान कोहपरे साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्य आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद क्षीरसागर सर…

या सर्वांच्या मार्गदर्शनात व गावाच्या आधारामुळे शाळा वटवृक्षाचा आकार घेत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये