स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक सांस्कृतिक उत्सव उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट
स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार मोहनीश शेलवटकर, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, विस्तार अधिकारी तामगाडगे सर, नगराध्यक्षा पिपरी मॅडम, उपनगराध्यक्ष पिंटूभाऊ मंगळगिरीवार, संस्थेचे संचालक प्रा. संदीप ढोबळे, सचिव माधुरी ढोबळे, अलकाताई आत्राम, हरीश धवस, राहुल संतोषवार, धम्माजी निमगडे तसेच शाळेचे प्राचार्य साहिल येलेटीवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावेत, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, असे मत संचालक प्रा. संदीप ढोबळे यांनी व्यक्त केले.



