ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्युहरचना व सामुहीक प्रयत्नामुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता – हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपाला अपयश आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातल्याने नव्या यशस्वी समिकरणातून चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसविण्यास पक्षाला यश मिळाल्याचा फार आनंद झाल्याचे पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

नवनिर्वाचित महापौर सौ. संगीता खांडेकर व उपमहापौर प्रशांत दानव यांचे अभिनंदन करतांनाच सर्व नगरसेवक, भाजपा महायुती व नव्या समिकरणातून सोबत आलेले शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे , अपक्ष नगरसेवक नंदु नागरकर यांचेही मनःपुर्वक अभिनंदन.

निवडणुक प्रमुख आ. किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत भाजपाला पुन्हा सत्तेत बसविण्यास मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सहकार्य करीत आमदार किशोर जोरगेवार यांना अपक्ष व उबाठा सोबत सहयोग घेण्यास अनुमती देत प्रदेशस्तरावरुन प्रभावी कार्य केल्याने राज्यातील महत्वपुर्ण महानगरपालिकेत भाजपा व सहयोगी पक्षाची सत्ता स्थापत नगर परिषद निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला याचा विशेष आनंद आहे.

 न.प. निवडणुक पराभवानंतर देवेंन्द्र फडणवीस म्हणाले होते जिल्ह्याला विशेष ताकद देईल.

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घोषीत केल्याप्रमाणे दिलेली अधिकची ताकद, नगरसेवक तथा कार्यकर्त्यांची प्रामाणिकता व अविश्रांत परिश्रम, सर्व नेत्यांनी सामुहीकपणे केलेले प्रयत्न हेच या यशामागील गमक असून भाजपा, महायुती, उबाठा व अपक्षांच्या नेतृत्वात भाजप महापौर सत्तेत बसला हे अभिनंदनिय असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये