ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प. प्राथमिक शाळा, चिचोर्डी (नवीन) येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

गीतगायन, वैयक्तिक नृत्य, सामुहिक नृत्य अशे ४० प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरिकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        पुस्तकी शिक्षणासोबतच बालकांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा या करिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचोर्डी (नवीन) भद्रावती येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक ०७ रोजी शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आले.

कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष प्रफुलभाऊ चटकी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी बंन्डूजी आकनूरवार, सहा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून महेशभाऊ जीवतोडे, नगरसेवक, उषाताई जाधव नगरसेवक, विजय भोयर, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, भसारकर सर, से.नि.शिक्षक, संतोष बेले सांख्यिकी सहायक, डायट चंद्रपूर, माधवराव बांगडे, सदस्य, श्रीमती अर्चना खंडाळे, योग प्रशिक्षक, आकनुरवार, अमृत सिडाम, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित नगराराध्यक्ष व नगरसेवक यांचा सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार प्रभाग क्रमांक १ व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत करण्यात आला.

शाळेतील मुलांनी स्वागत गीतांनी व शोभिवंत रोपटे देऊन पाहुण्याचे स्वागत केले. कार्यक्रमात मुलांनी गीतगायन, वैयक्तिक नृत्य, सामुहिक नृत्य अशे एकूण ४० प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून पाहुण्याचे व प्रेक्षकांचे मने मुलांनी जिंकली. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन संतोष बेले यांनी केले.

नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी शाळेला भौतिक सुविधेबाबत आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रशासकीय बाबतीत आकनूरवार साहेब यांनी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता श्री अमृतजी सिडाम, प्रीती बेले, आकाश पेंदोर, शंकरभाऊ ठाकरे, सीमाताई सिडाम, प्रीती पेंदोर, मनीष कांबळे, ममता शेंडे, अंजली कांबळे, नाजूक तुरानकर बोढेकर काकाजी, मंगेश क्षीरसागर या शाळा व्यवस्थापन समिती सदस्याने, पालक व शाळेतील मुलांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये