ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवीन रोटरी वर्ष ‘राजपर्व’ 2026-27 ची दमदार सुरुवात

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या रोटरी वर्ष ‘राजपर्व 2026-27’ ची सुरुवात चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली यांच्या आशीर्वादाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. नव्याने नियुक्त झालेल्या अध्यक्षा रोटे. स्मिता संजय जिवतोडे (संचालिका, चांदा पब्लिक स्कूल) तसेच क्लब सेक्रेटरी रोटे. विशाल खांडरे (संचालक, एस.एस.किंगडम) यांनी 1 जुलै रोजी आपल्या पदभाराची जबाबदारी स्विकारत नव्या वर्षाच्या सेवाकार्याचा शुभारंभ केला. यावेळी मोठ्या संख्येने रोटेरियन्स उपस्थित होते.

‘राजपर्व’ वर्षाची सुरुवात ‘डॉक्टर्स डे’ आणि ‘सी.ए. डे’ या विशेष उपक्रमाने करण्यात आली. समाजाच्या आरोग्य आणि आर्थिक समृध्दीत मोलाचे योगदान देणा-या डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटस् प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस ‘गॅ्रटीट्यूट डे’ म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी रोटरी क्लबमध्ये कार्यरत असलेल्या रोटे. डॉ. अशोक वासलवार, रोटे. डॉ. रेखा दांडेकर, रोटे. डॉ. आसावरी देवतळे, रोटे. डॉ. अप्रतिम दीक्षित, रोटे. डॉ. प्रणीता ओसवाल, रोटे. डॉ. सिमला गाजर्लावार, रोटे. डॉ. शिवानी ढवस, रोटे. डॉ. पियुष घुबडे, रोटे. डॉ. आयुषी गुप्ता, रोटे. डॉ. विनोद मुसळे, रोटे. डॉ. सुनील मल्लोजवार, रोटे. डॉ. सारंग पद्मावार, रोटे. डॉ. हीबा हबीब, रोटे. डॉ. बालमुकुंद पालीवाल, रोटे. डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे, रोटे. डॉ. निखिल टोंगे, रोटे. डॉ. राम भारत, रोटे. डॉ. सुधीर मत्ते तसेच रोटे. सी.ए. शादाब चिनी, रोटे. सी.ए. सौरभ खोसला आणि रोटे. सी.ए. प्रमोद छाबडा यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या समाजोपयोगी कार्याला यावेळी उपस्थितांनी सलाम केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटे. डॉ. अशोक वासलवार, सहप्रांतपल रोटे. अनुपकुमार यादव, मातृ व शिशूसंगोपन महिन्याच्या प्रमुख पूर्वाध्यक्षा रोटे. अनुपा भामरी, नवनियुक्त अध्यक्षा रोटे. स्मिता संजय जिवतोडे आणि क्लब सेक्रेटरी रोटे. विशाल खांडरे यांची मंचावर उपस्थिती होती.

याप्रसंगी डिस्ट्रिक्ट ऑफीसर रोटे. विजय आईंचवार, रोटे. महेश उचके, रोटे. राम चांदे, रोटे. किर्ती चांदे, रोटे. सचिन गांगरेड्डीवार, रोटे. संदीप रामटेके, असि. गव्हर्नर रोटे. अनुपकुमार यादव, वरिष्ठ रोटे. अॅड. प्रशांत खजानची, रोटे. मधुसूदन रुंगठा तसेच इतर रोटेरियन्स उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व प्रभावी सूत्रसंचालन रोटे. डॉ. राजश्री मार्कंडेवार आणि रोटे. मिलिंद बोडखे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी क्लब सेक्रेटरी रोटे. विशाल खांडरे यांनी उपस्थित मान्यवर, सन्मानित डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटट्स आणि सर्व रोटेरियन्स यांचे आभार मानले.

रोटरी वर्ष ‘राजपर्व 2026-27’ ची सुरुवात समाजसेवा, कृतज्ञता आणि सेवाभावाचा संदेश देणा-या या प्रेरणादायी उपक्रमाने होत असल्याने उपस्थितांनी नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये