सकल जैन समाजातील विद्यार्थ्यांसाठी वस्ती गृहांची निर्मिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जैन समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या सात ठिकाणी वसतिगृहे (हॉस्टेल) उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सह्याद्री शासकीय अतिथीगृह, मुंबई येथे जैन विकास आर्थिक महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक मा. ना. ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यासोबतच ‘मराठी जैन साहित्य विश्वकोष’ निर्मितीसाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला. तसेच जैन युवकांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुख योजनांचे विशेष अभियान राबविणे, तसेच महिला बचत गटांसाठी विविध योजनांना गती देण्याचेही ठरविण्यात आले.
महिलांसाठी थेट कर्ज योजना आणि युवकांना व्यापारासाठी व्याज परतावा योजनाची अंमलबजावणी करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती समन्वयक संदीप भंडारी यांनी दिली.
बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव माधवी खोडे-चवरे, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोंदे, वित्त विभागाच्या कार्यासन अधिकारी रचना तळेकर, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, समन्वयक संदीप भंडारी, महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील, सुनील पाटणी तसेच विकास अच्छा, अमित जैन, दर्शना जैन, विश्वजीत कोल्हापुरे आणि प्रशांत गौडाजे उपस्थित होते.



