ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

29 डिसेंबर रोजी देऊळगाव राजा नगरीमध्ये प्रथमच जैनांचे जगद्गुरुचे भव्यदिव्य आगमन

 (संपूर्ण सकल दिगंबर जैन समाज गुरुदेवांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत तल्लीन. तीन दिवसीय धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचची राहणार रेलचेल)

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 परमपूज्य अष्टांग निमितज्ञ मंत्रविद्या चक्रवर्ती आर्षमार्ग संरक्षक अभिनय पूज्यपाद जगतगुरू भारत गौरव गणाधिपती गणाधराचार्य श्री 108 कुंथू सागर जी गुरुदेव व त्यांचा संघ यांचे श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरी देऊळगाव राजा येथे इतिहासात नोंद होईल असे भव्यदिव्य आगमन दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी होत असून शहरातील सकल दिगंबर जैन समाजाने याची जय्यत तयारी केली असून गुरुदेवांच्या तीन दिवस विश्राम 31 डिसेंबर 25 पर्यन्त या नगरीत राहणार असल्याने बाहेरगावरून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या सोयीसाठी समाजाने पुरेपूर व्यवस्था केलेली आहे यासोबतच तीनही दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध आखणी करण्यात आलेली आहे . महाप्रसादी देण्याचा मान जयंत प्रभाकर वाटाणे , अतिश रतनलाल खवडे व सुबोध मिश्रीकोटकर यांना मिळालेला आहे.मोठ्या प्रमाणात संगीतमय जैन भजन संध्याचे जोरदार आयोजन तीनही दिवस केले असुन संगीतकार अश्विनीताई उपाध्ये अकिवाट हे भक्तांना त्यांच्या मुखाने मंत्रमुग्ध करणार आहेत.

सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी व गुरुदेवांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत सकल दिगंबर जैन समाज तल्लीन झालेला दिसून येत आहे सर्व धार्मिक सांस्कृतिक व महाप्रसादाचा सकल दिगंबर जैन समाजाने लाभ घेण्याचे आव्हान सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने करण्यात आले असून दिनांक 29 डिसेंबर रोजी गुरुदेवांच्या आगमनानंतर महात्मा फुले चौकात जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते गुरुदेवांचे व संघातील मुनींचे पाद प्रक्षालन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये