ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेलंगणा स्टेटमध्ये केवलदास गेडाम श्री गुरुदेव उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

        कळमगाव (गन्ना) येथील रहिवासी, पेशाने शिक्षक व श्री गुरुदेव सामाजिक कार्यकर्ते केवलदास गेडाम गुरुजी यांना दिवंगत जगन्नाथरावजी गावंडे स्मृती श्री गुरुदेव उत्कृष्ट सेवा कार्य पुरस्काराने‌ सन्मानित करण्यात आले. २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन गोयेगाव जि. आसिफाबाद (तेलंगणा स्टेट) येथे नुकतेच संपन्न झाले . यावेळी संमेलनाध्यक्ष एड. पारोमिता गोस्वामी, उद्घाटक आम. कोवा लक्ष्मी, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख गोपालराव कडू, परिषदेचे चिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, उपाध्यक्ष विलास उगे, विलास चौधरी, श्रीकांत धोटे , अर्जुन पारुडकर, रमेश सोनुले, येमाजी गाऊत्रे यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

    गेल्या दहा वर्षांपासून श्री. केवलदास गेडाम गुरूजी शैक्षणिक सेवेसोबतच सामाजिक , सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सेवा देत असून कळमगाव गन्ना येथील सामुदायिक प्रार्थना मंदिर निर्माण कार्य , श्री गुरुदेव सेवा मंडळाचे दैनंदिन कार्य करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे . समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार रूजवण्यासठी ते प्रयत्न करीत आहे, हे विशेष.

पुरस्कार मिळाल्याबद्दल परिषदेचे विशाल गावंडे , गुणवंत कुत्तरमारे, डॉ. बानासुरे, धम्म मित्र नामदेव गेडकर, विनायक साळवे , देवराव कोंडेकर, एड. सारिका जेनेकर, नामदेव पिज्दूरकर, गणेश मांडवकर, भाऊराव बोबडे, काशीनाथ बावणे, मारोती गेडाम, अरूण सत्यकार, नामदेव पाखमोडे, नत्थुजी कन्नाके,खुशाल मगरे आदी श्री गुरुदेव सेवकांनी गेडाम गुरूजी यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये