ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनुराग मुळे राज्यस्तरीय श्री गुरुदेव उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       ब्रम्हपुरी येथील रहिवासी, श्री गुरुदेव युवा सामाजिक कार्यकर्ते तथा सुप्रसिद्ध झाडीपट्टी कलावंत अनुराग मुळे यांना दिवंगत तुळसाबाई चौधरी स्मृती श्री गुरुदेव उत्कृष्ट लोक कलावंत पुरस्काराने‌ सन्मानित करण्यात आले. २० वे आंतरराज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन गोयेगाव जि. आसिफाबाद (तेलंगणा स्टेट) येथे नुकतेच संपन्न झाले . यावेळी संमेलनाध्यक्ष एड. पारोमिता गोस्वामी, उद्घाटक आम. कोवा लक्ष्मी, अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख गोपालराव कडू, राजुरा श्री गुरुदेव सेवा मंडळाचे नगर सेवाधिकारी बळीराम बोबडे, विलास चौधरी, परिषदेचे चिटणीस एड. राजेंद्र जेनेकर, उपाध्यक्ष विलास उगे, श्रीकांत धोटे , अर्जुन पारुडकर यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

    गेल्या दहा वर्षांपासून श्री. अनुराग मुळे हे कला, सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रात सेवा देत असून झाडीपट्टी रंगभूमीवरील लोक कलावंत म्हणून बरेच प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध भारूडकार चेतन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कलेचे धडे गिरवले आणि अलिकडे ते एकपात्री प्रयोग, भारूड आदी कलांच्या माध्यमातून ते खेड्यापाड्यात जनप्रबोधन करीत असतात. आय. टी. आय. गडचिरोली येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले असून एक उमदा तरुण कलावंत म्हणून संमेलन समितीस ते सदैव प्रबोधन सेवा देत असतात. पुरस्कार मिळाल्याबद्दल परिषदेचे संजय तिळसम्रुतकर, प्रभाकर नवघरे, धम्म मित्र नामदेव गेडकर, देवराव कोंडेकर, एड. सारिका जेनेकर, नामदेव पिज्दूरकर, गणेश मांडवकर, भाऊराव बोबडे, संजय पोडे, सुरेश चौधरी आदींनी श्री .अनुराग मुळे यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये