ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोकमान्य विद्यालयाच्या हिमांशू सैतानेचे मैदानी स्पर्धेत सुयश

पेंच येथे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड द्वारा क्रीडा स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          पेंच येथे वेस्टर्न कोल फिल्ड लिमिटेड द्वारा आयोजित क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशू दत्तूजी सैताने या विद्यार्थ्याने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये यश प्राप्त करून पुढील स्पर्धेकरीता आपले स्थान निश्चित केले.

हिमांशूच्या या यशाबद्दल लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांतजी गुंडावार, सचिव उल्हास भास्करवार, शाळा समिती अध्यक्ष गोपाल ठेंगणे, सहसचिव अमित गुंडावार, कार्याध्यक्ष सचिन सरपटवार, सदस्य उमाकांत गुंडावर, अविनाश पामट्टीवार,संजय पारधे, तसेच लोकमान्य विद्यालय चे प्राचार्य रूपचंद धारणे,उपप्राचार्य प्रफुल वटे, पर्यवेक्षक आशुतोष सुरावार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

हिमांशुनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व गुरूंना दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये