Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक व फार्मसी बेटाळा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, फार्मसी (डी फार्म,डीएमयलटी) यांच्या संयुक्त विद्यमनाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२४ मध्ये प्राविण्य प्राप्त करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आ.प्रा.अतुल देशकर उपस्थित होते. प्रमूख अतिथी म्हणून डॉ. भारत गणवीर अध्यक्ष इंडिअन मेडिकल अससोसिएशन ब्रम्हपुरी,शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी चे प्राचार्य डॉ. आर एल वानखेडे,यंत्र अभियांत्रिकी शाखेचे विभागप्रमुख प्रा.आर एम राचलवार,प्रा.अशोक सालोटकर,संस्थेचे अध्यक्ष प्रा देवेंद्र पिसे, कु.थोरवी पिसे, फार्मसी चे प्राचार्य डॉ.सचिन दुधे,विभागप्रमुख प्रा. विशाल लोखंडे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.सुयोग बाळबुधे व्यासपिठावर उपस्थित होते. कार्यक्रमात जे विद्यार्थी प्रविणपूर्ण प्राप्त केलेत व जे विद्यार्थी अंतिम वर्ष पूर्ण केलेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रा.अतुलजी देशकर,डॉ.आर एल वानखेडे, प्रा.आर एम राचलवार,कु.थोरवी पिसे यांनी सर्व विद्यार्थ्यांना अप्रतिम असे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. देवेंद्र पिसे यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व यशाची परंपरा अखेर पर्यंत सुरू राहण्यासाठी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर वृंदास शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुयोग बाळबुधे तर आभार प्रा.रुपेश ढोरे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगाणाने करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये