ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आयुक्तांनी घेतली राजकीय पक्षांची दुसरी बैठक

टोल फ्री क्रमांकावर करता येणार निवडणुकीसंबंधी तक्रार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ दि. १५ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या चंद्रपुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्यास्तीत ज्यास्त मतदान व्हावे या दृष्टीने प्रशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या मतदान जनजागृती (SVEEP) मोहिमेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घेऊन मतदानाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन आयुक्त अकुनुरी नरेश यांनी केले.

    मनपा कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. आयुक्त अकुनुरी नरेश,मनपा जनसंपर्क अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या चर्चेत विविध राजकीय पक्षांद्वारे निवडणूक प्रक्रियेसंबंधी आलेल्या सूचनांवर निश्चित विचार करण्याचे तसेच ज्या सुचना व्यवहार्य आहेत त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

    राज्य निवडणूक आयोगाने १६ डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिका मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. आचारसंहितेचे कुठेही त्याचे उल्लंघन होणार नाही, याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी.

    मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेत सर्व परवानगी एकच ठिकाणाहून देण्यात येत असुन निवडणुकीच्या अनुषंगाने काही तक्रार करावयाची असल्यास टोल फ्री १८००३०९७०४० व व्हॉट्सअँप क्रमांक ९०११०९५१६८ या क्रमांकावर करता येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये