मांडवा व शिवापूर येथे कोंबडा जुगारावर पोलिसांची धाड
सात मोटारसायकली जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना पोलीस स्टेशन हद्दीतील मांडवा व शिवापूर गावात सुरू असलेल्या कोंबडा जुगारावर रविवारी (दि. २८) कोरपना पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली.
मांडवा येथे करण्यात आलेल्या कारवाईत दोन कोंबडे, दोन काती (सुरी) व दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. तर शिवापूर येथे दोन कोंबडे, दोन काती व तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान कोंबडा बाजारातील काही व्यक्ती घटनास्थळावरून फरार झाले. मात्र त्यांनी आपली वाहने तेथेच सोडून पळ काढला.
या कारवाईत एकूण सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, सुमारे ३ लाख ९० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक लता वाडीये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बळीराम पवार, नामदेव पवार, लक्ष्मण नूचे, दिलीप नागतूरे, विनोद जाधव, सटवा नामपले यांच्यासह कोरपना पोलिसांच्या पथकाने केली.



