ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुंदन प्लाझा चौकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती

मुख्य अभियंत्यांनी दिले २० लाख रुपयांच्या कामाचे आदेश

चांदा ब्लास्ट

  चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन (CSTPS) कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर, कुंदन प्लाझा चौकाजवळील रेल्वे उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येबाबत विविध वृत्तपत्रांमध्ये देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीरपणे समोर आला.

या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक मा. इंजि. श्री. सुभाष भाऊ कसंगोट्टुवार यांनी स्वतः CSTPS चे मुख्य अभियंता यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तातडीने निवेदन सादर केले.या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली असून, औद्योगिक तसेच दैनंदिन वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले.

या निवेदनाची तात्काळ दखल घेत मुख्य अभियंत्यांनी रस्ता व रेल्वे उड्डाणपुलाच्या (ब्रिज) दुरुस्तीसाठी सुमारे २० लाख रुपयांच्या कामास मंजुरी देत आवश्यक आदेश काढले असून, त्यासाठी टेंडर प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे.

या कामामुळे राष्ट्रवादी नगर, वृंदावन नगर, तुळशी नगर तसेच इतर वसाहतींमधील नागरिकांसाठी तसेच चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही दुरुस्ती अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. लवकरच खड्ड्यांची दुरुस्ती व आवश्यक डांबरीकरणाचे काम सुरू होणार असल्याने CSTPS मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये