ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कामगार संघटना आयटकचा देशव्यापी आंदोलन शंभर टक्के यशस्वी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणा विरोधात तहसील कार्यालय परिसर भद्रावती येथे दुपारी १ ते ५ वाजे पर्यंत भव्य धरणा निदर्शने करून तहसीलदार राजेश भांडारकर यांचे मार्फत राष्ट्रपती पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आयुक्त,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे आंदोलन कॉम्रेड राजू एम. गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा संघटक आयटक यांच्या नेतृत्वात यशस्वी पार पडले.

सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे आणि नवीन आर्थिक धोरणामुळे कामगार संघटनाची शक्ती खिळखीळी झाली आहे. देशातील सर्व कामगारांनी लढून मिळवलेले सर्व कायदे बासनात गुंडाळले जात आहेत. सन १९२० ते १९४७ दरम्यान देशात अनेक कायदे निर्माण झाले आणि या सर्व लढ्यामध्ये कामगारांचा सहभाग मोठा होता.

याचा आयटक ला अभिमान आहे .आयटक संघटनेने सर्व केंद्रीय कामगार संघटना कृती समितीने पुकारलेला देशव्यापी संप शंभर टक्के यशस्वी करण्यात आला.

या आदोलनाच्या प्रमुख मागण्या (१) केंद्र सरकार द्वारा लागू श्रमिक विरोधी चार श्रम संहिता त्वरित मागे घेऊन या संहिता लागू करणे संबधी दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी अचानक जारी केलेली अधिसूचना रद्द करा (२) सामान काम सामान वेतन लागू करा (३) खाजगीकरण व व्यापारीकरण बंद करा (४) महागाई व दरवाढ कमी करा (५) राज्य शासनाकडे प्रलंबित आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करा (७) स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या व इतर मागण्या होत्या.

     या आंदोलनात (संपात) वेकोली,आयुध निर्मानी डिफेन्स (ओ एफ सी) पोस्ट आफिस,बँक, एल.आय सी (भारतीय बिमा निगम) रेल्वे,शालेय पोषण आहार कर्मचारी,आशा वर्कर, अंगणवाडी – बालवाडी, शासकीय – निमशासकीय आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

स्थानिक पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात चोखपोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या देशव्यापी संपात कॉ राजू गैनवार,कॉ अरविंद कुमार कॅप्टन,कॉ शकील शेख, कॉ नसरीन खा पठाण,कॉ लता देवगडे, कॉ बंडू डोंगे,कॉ माला गायकवाड ,कॉ रत्नमाला खडसे, कॉ मनीषा मत्ते,कॉ वंदना बेलूरकर,कॉ.शार.दा सिडाम,कॉ सुरेश बावणे,कॉ. नाणेबाई बोबडे आदी आंदोलनात सक्रीय सहभागी होत्या.

 आंदोलकांनी कायदा व सुव्यवस्था राखून एक दिवसीय आंदोलन यशस्वी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये