निवृत्तीजी एच पी गॅस एजन्सीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक
एचपीसीएल गॅस कं.च्या महाराष्ट्र व गोवा राज्य प्रमुखांची जिवतीला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना-३ सध्या देशभरात सुरु आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या व्यक्तीकडे कुठल्याही गॅस कंपनीमध्ये कनेक्शन नसल्याची ऑनलाईन पडताळणी केली जाते. त्यांच्याकडे कुठलेही गॅस कनेक्शन नसल्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्याकडून १४ मुद्यांचे घोषणापत्र घेऊन ऑनलाईन अर्ज केला जातो आणि त्यानंतर अर्जास मंजुरी मिळून नागरिकांना योजनेचा लाभ मिळतो.सदर प्रक्रिया किचकट असल्यामुळे तसेच अनेक कागदपत्रांची आवश्यकता असल्यामुळे अनेक वितरक ग्राहकांना लाभ देण्यास उत्सुकता दाखवत नाहीत. परंतु निवृत्तीजी एच पी गॅस एजन्सी चे वितरक जयश्री अंकुश गोतावळे आणि सहवितरक डॉ. अंकुश अर्जुनराव गोतावळे यांनी विशेष लक्ष घालून उज्वला गॅस योजनेचा लाभ ८४९५ ग्राहकांना यापूर्वीसुद्धा जिवती तालुक्यातील जनतेला मिळवून दिलेला आहे.तसेच उज्वला ३.० योजनेमध्ये सुद्धा त्यांनी सर्वाधिक रजिस्ट्रेशन केले आहेत.
संपूर्ण राज्यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी वितरक अनेक अडचणी सांगत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती सारख्या ग्रामीण भागातुन झालेले रजिस्ट्रेशन पाहुण महाराष्ट्र व गोवा राज्याचे (पश्चिम विभागीय) चीफ जनरल मॅनेजर श्रीनिवास राव नल्ली तसेच चीफ रिजनल मॅनेजर नागपूर एलपीजी RO- संजय कुमार देवांगण आणि एरिया सेल्स मॅनेजर आकाश गौर यांनी निवृत्तीजी एच पी गॅस एजन्सी ला भेट देऊन सदर योजनेच्या अमलबजावणी चा संपूर्ण आढावा घेतला.लाभार्थ्यांच्या दस्ताऐवजांची तपासणी करून काही लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन दिलेल्या लाभाची प्रत्यक्ष पाहणी केली.
तसेच अनेक ग्राहकांना भेटून अंमलबजावणी बाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. निवृत्तीजी गॅस एजन्सी ने उत्कृष्ट नियोजन, भरपूर परिश्रम आणि अनेक अडचणींवर मात करून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल तसेच ग्राहकांनी दिलेल्या उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिक्रिया पाहून सर्व अधिकाऱ्यांनी वितरकांचे भरभरून कौतुक केले.सोबतच गॅस एजन्सीचे मॅनेजर रणजित सूर्यवंशी, डाटा एंट्री ऑपरेटर अजय नरहरे, संभाजी कांबळे यांनी सातत्यपूर्ण केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले.तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः काही ग्राहकांच्या ई- केवायसी केल्या आणि त्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी बाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन केले.



