तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत पालडोह शाळेचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह या शाळेने तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत उंच कामगिरी करत तब्बल १० बक्षीस मिळवली.पालडोह ही शाळा वर्षाच्या ३६५ दिवस सुरू असते यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्याचे काम पालडोह शाळा ही वर्षाच्या ३६५ दिवस करत असते, त्यात नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १० बक्षीसांवर आपले नाव कोरत केंद्र टेकामांडव्याचे नाव लौकिक केले आहे. प्राथमिक गटात कुमारी देवांशी उगलमुगले हिने चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक,कुमारी रेखा माने हिने स्वयंसपूर्त भाषण या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
माध्यमिक गटातून चित्रकला स्पर्धेत कुमारी वैष्णवी इंदले हिने प्रथम क्रमांक, स्वयंस्फूर्त भाषण व बुद्धिमापन या दोन स्पर्धेत आदित्य बाजगीर याने प्रथम क्रमांक पटकावला. मनोहर दूधभाते याने कथाकथन या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.सुंदर हस्ताक्षर व स्वयंस्फूर्त लेखन या दोन स्पर्धेत कुमारी कावेरी राऊतवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला. एकपात्री अभिनय या स्पर्धेत कुमारी योगिनी माने हिने प्रथम क्रमांक पटकावला.तर पवन चिनुरे या विद्यार्थ्यांने स्मरणशक्ती या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालडोह ने मिळवलेली बक्षिसे यांचे कौतुक होत असून ही शाळा नेहमीच तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असते.शालेय व्यवस्थापन समिती तथा शाळेतील गजानन राठोड,सुनील आडे,सतीश गाकरे,कु निकिता इंझळकर, विश्रांती धुळगुंडे,पूजा चव्हाण,ऋतुजा बोवाडे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी यांनी मुलांचे अभिनंदन केले.



