सोनुर्ली येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय, सोनुर्ली येथे वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांना वर्ग 9 च्या बिद्यार्थ्यांकडून निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री साईनाथ मेश्राम मुख्याध्यापक, म गा विद्यालय गडचांदूर व सतीश ठाकरे सर हे होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थानी प्राचार्य, मुख्याध्यापक श्री बबन भोयर होते यावेळी इतर सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार कारण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य मेश्राम यांनी विध्यार्थांनी मेहनत घेऊन अधिकाधिक गुण मिळावावे मग वाटल्यास आपल्या आवडीनुसार समोरील शाखा निवडावी व त्यात यश प्राप्त करावे, त्याचा वापर स्वतः बरोबर समाजासाठी करून ध्यावा असे मार्गदर्शनपर भाषणात व्यक्त केले.
तसेच मुख्याध्यापक, प्राचार्य श्री भोयर यांनी सांगितले की सर्व विध्यार्थी पास होऊ शकतात मात्र मेहनत घ्यावी लागेल,पास व्हायासाठी कोणीही गैरमार्गाचा वापर करु नये. पालक, शिक्षक व स्वतःचे स्वप्न पूर्ण करावे असे भाषणात सुचविले. या प्रसंगी विध्यार्थांनी आपले मनोगत व्यक्त केले.



