ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ५७ वा पुण्यस्मरण सोहळा उत्साहात साजरा होणार 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपुर | वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरणानिमित्त समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक ३० व ३१ डिसेंबर २०२५ (मंगळवार व बुधवार) रोजी ध्यान प्रार्थना मंदिर, श्रीराम वॉर्ड क्रमांक २, घुग्घुस येथे करण्यात आले आहे. हा सोहळा श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त ग्राम स्वच्छता अभियान, सामुदायिक ध्यान व प्रार्थना, योग-प्राणायाम शिबिर, रामधून, समाज प्रबोधन व राष्ट्रीय कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा व साहित्याचा प्रचार-प्रसार व्हावा, ग्रामगीत व अन्य साहित्याच्या माध्यमातून मानवी धर्म जागृत व्हावा, समाजातील प्रत्येक घटकात समन्वय निर्माण व्हावा तसेच समाजसुधारणा व शांती प्रस्थापित व्हावी, हा या सोहळ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या कार्यक्रमास नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मधुकर मालेकर (अध्यक्ष), सुरेश बोबडे (उपाध्यक्ष), संजय बोबडे (सचिव), नीलकंठ नांदे (संस्थापक सचिव), नारायणराव ठेंगणे (कोषाध्यक्ष) व पंढरी कातारकर (संघटक) यांनी केले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुण्यस्मरण सोहळा प्रेरणादायी ठरणार असल्याचे नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये