Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतूक तस्करी करणाऱ्या ट्रैक्टरवर भद्रावती महसुल विभागाची कारवाई

ढोरवासा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         रात्रीचा फायदा घेत रेतिची तस्करी करीत असलेले ट्रैक्टर भद्रावती तहसील कार्यालयाच्या गौण खणीज पथकाव्दारे पकडण्यात आले. सदर कारवाई भद्रावती तहसील कार्यालयाचे तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात गौण खणीज पथकाने दि. 15 जुन 2024 रोज शनिवारला रात्रो तीन वाजता करण्यात आली. ही कारवाई तालुक्यातील ढोरवासा येथील रस्त्याने ट्रैक्टर अवैध्य रेती भरून येत असताना करण्यात आली. सदर रेतितस्करितीलएक ट्रैक्टर महसुल विभागाने आपल्या ताब्यात घेतले असुन त्यावरील कारवाई सुरु केली आहे.

या घटनेत जवळपास ट्रॅक्टर वर लाख रुपयांच्या वर दंड आकारण्यात येईल असा अंदाज आहे. सदर चारगाव अहिरे घाट व अन्य नदिघाटावरुन नेहमी रात्रोच्या व दिवसा रेतिची तस्करी होत असल्याची माहिती महसूल विभागांना आली होती त्यावर कारवाई करण्यात आली. सदर ट्रैक्टर बंटी हेमके यांचे असुन भद्रावती येथील रहिवासी असल्याचे कळते. तपासणी दरम्यान ट्रॅक्टर चालक व मालका जवळ कोणताही रेती वाहतुकीचा परवाना नसल्याने ती रेती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असुन ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे. या घटनेची पुढील कारवाई तहसिलदार अनिकेत सोनवणे यांच्या नेतृत्वात तलाठी अनिल दडमल, कपिल सोनकांबळे, खुशाल मस्के हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये