ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ईद-उल-अजहानिमित्त मुस्लिम धर्मगुरूचा शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट
चंद्रपुरात शांती, प्रगती, समृद्धी, बंधुभाव आणि प्रेमासाठी प्रार्थना करत बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच शाही गुप्ता मशीद इदगाह येथे मुस्लिम धर्मगुरूंचे स्वागत केले. लोकसभा निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल काँग्रेसचे काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी मान्यवरांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन आभार मानले. यावेळी शाही गुप्ता मशिदीचे इमाम तन्वीर आलम साहब, शाही गुप्ता मशिदीचे सदर इम्रान भाई, समिती सदस्य व काँग्रेस युवा नेते कादर भाई, हाजी अहमद भाई, डीडी खान, आतिफ भाई, सलीम भाई, हुसेन भाई, रोशन रामटेके, अविनाश भाई. भाई मेश्राम, सचिन रणवीर आदी उपस्थित होते.