ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीच्या पंपावर भेसळयुक्त पेट्रोलची विक्री

चौकशी करून पपंचालकावर कारवाई करण्याची ग्राहकांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील मालपाणी पेट्रोल पंपांवर वितरीत केल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये पाण्याची व डिझेलची भेसळ होत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. इंधन वितरण करणाऱ्या विविध पेट्रोलियम कंपन्यांतून इथेनॉल मिश्रणाचे सुरू असलेले गौडबंगाल आणि येथील मालपाणी पेट्रोल पंपचालकांच्या इंधन साठवणुकीच्या टाकीतुन पाणीयुक्त पेट्रोल येत असल्याने ग्राहकांना पाणी व डिझेलयुक्त पेट्रोल दिल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सध्या पंपचालकांकडून चांगल्या पेट्रोलच्या नावाखाली ग्राहकांची लूटमार सुरू आहे. आठ दिवसापासून वाहनधारकांना पंपावर पाणी व डिझेलमिश्रित पेट्रोल मिळत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत. पंपांवर पेट्रोल भरल्यानंतर दोन मिनीटे ते अर्ध्या तासाच्या कालावधीत दुचाकी-चारचाकी वाहन बंद पडते. मोटार अथवा मोटारसायकल सुरू करण्याचा प्रयत्न करूनही वाहनधारक हैराण होत आहेत. दुरूस्तीसाठी मेकॅनिकला बोलविण्यानंतर तपासणीत वाहन नादुरूस्त होण्याचे खरे कारण उघड होत आहे. एक लिटर पेट्रोलमध्ये निम्मे डिझेल मिसळले असल्याचा प्रकार काही ग्राहक सांगत आहेत.

मालपाणी पेट्रोल पंपाच्या ग्राहकांना या प्रकाराचा अनुभव सातत्याने येत आहे. शहरातील टू व्हिलर मेकॅनिकलकडे अशा तक्रारींचा ओघ वाढला आहे. बहुतांश सर्व दुचाकी मेकॅनिकच्या गॅरेजमध्ये दररोज दहा ते पंधरा दुचाकी वाहने अशा प्रकारच्या दुरूस्तीसाठी येत आहेत. पाणी भेसळीमुळे इंधनाचा स्पार्क प्लग, पिस्टन आणि मायलेजवर परिणाम होत आहे. अशा प्रकारांकडे जिल्हा पुरवठा कार्यालय आणि वैधमापन शास्त्र विभागाने काणाडोळा केला आहे.

पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांकडून किती टक्के इथेनॉल मिसळले जाते, याची माहिती शहरातील ग्राहकांना नाही. पेट्रोल पंपचालकांच्या पंपांवर टाकीत इंधन उतरविण्यापूर्वीच पाणी असेल त्यामुळे पेट्रोल भरताना पाणीमिश्रित पेट्रोल ग्राहकांना मिळत आहे. त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. इथेनॉलचे कारण पुढे करून पेट्रोलियम कंपन्या आणि तालुक्यातील एकमेव पेट्रोल पंपचालकाने याची जबाबदारी घेतलेली नाही. याची विक्री अधिकारी, वैधमापनशास्त्र विभागाकडूनही तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने ग्राहकांचा मन:स्ताप वाढला आहे.

● दुचाकी वाहन अचानक बंद पडले म्हणून मेकॅनिककडे दुरूस्तीला दिली. त्यावेळी मेकॅनिकने वाहनाच्या टाकीतून काढलेल्या पेट्रोलमध्ये डिझेल व पाणीमिश्रीत असल्याचे निदर्शनास आले. पेट्रोल पंपचालकांकडून ग्राहकांची लूट सुरू आहे. व आर्थिक मन:स्तापासह फसवणूक केली जात आहे.

                     संतोष इंद्राळे, नागरिक जिवती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये