कुंभेफळ फाटा येथे प्रवेशद्वार कमानीचा लोकार्पण सोहळा संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
कुंबेफळ,फाटा, येथे छत्रपती संभाजी नगर,ते बुलढाणा रोड या ठिकाणी,वीर जवान सतीश काकड,प्रवेशद्वार कुंबेफळ या प्रवेशद्वार चा लोकार्पण सोहळा हेलपिंग हॅन्ड ग्रुप कुंबेफळ च्या वतीने 17जून ला संपन्न झाला.
सविस्तर वृत्त असे की,वीर जवान सतीश काकड हे राज्य राखीव दलामध्ये गेल्या 12 वर्षा पासून सेवेत होते,निवडणूक कर्तव्य निमित्त त्यांचा कॅम्प काही दिवसासाठी मुंबई येथे हलविण्यात आला होता, ते आपले कर्तव्य बजावत असतांना, त्यांना तीव्र हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राण ज्योत मालवली.त्यांच्या अंत्य विधी नंतर हेलपिंग हॅन्ड ग्रुप ने त्यांचे प्रवेशद्वार उभे करण्याचे ठरविले,जेणेकरून या जवानाच्या समर्पणाला महत्त्व प्राप्त होईल व या गावाला या जवानाच्या नावाने ओळखले जाईल, ते प्रत्येकाच्या हृदयात जिवंत राहील, त्यांचे आई बाबा,पत्नी,मुले यांना अभिमान वाटेल.
हेल्पिग हॅन्ड ग्रुप चा इतिहास असा की, कोरोना काळात सर्वाना आपले गाव आठवले,ज्या प्रमाने लहान लेकरू भीती पोटी आईच्या पदराखाली लपते व सुरक्षित होते,त्याप्रमाणे नोकरी साठी गाव सोडलेले सर्व सुरक्षित ठिकाण म्हणून आपल्या आपल्या गावी पोहचले व गावाने सर्वाना सुरक्षित ठेवले.या काळात गावातील संभाजी नगर जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकाची नोकरी करत असलेले श्री अशोक आघाव यांना गावी असताना एक कल्पना सुचली की,या गावाचे आपण ऋणी आहोत गावासाठी काहीतरी करावे,म्हणून त्यांनी गावातील नोकरीत असलेल्या काही मित्रा सोबत चर्चा केली, व्हाट्सएपच्या माध्यमातून एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्यांना जोडत गेले व अखेर 70 सभासदाचा ग्रुप तयार झाला,ग्रुप हा जात,पात, धर्म या गोष्टी बाजूला ठेवून फक्त गाव कार्यासाठी काम करण्याचे ठरले आणि प्रथम या ग्रुप ने पुस्तक चळवळ सुरू करून एक वाचनालय सुरू केले.
स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके पुरविले,याच दरम्यान गावातील मदन वाघ हे काही महिन्यांपूर्वी सैन्यातून निवृत्त होऊन आले होते. त्यांच्या माध्यमातून,कल्पनेतून मुलांना भर्तीपूर्व प्रशिक्षण चालू केले, त्यांनी मुलांना प्रशिक्षित करणे सुरू केले.सकाळी त्यांना पाच सहा किलोमीटर धावण्यासाठी घेऊन जाणे,वेगवेगळ्या कसरती करून घेणं,सुरू केले,ग्रुप ने यासाठी लागणारे साहित्य पुरविले,धावण्यासाठी रोडवर धोका वाटू लागल्याने,रोड खालीवर असल्याने,ग्रुप ने धावण्यासाठी ट्रॅक निर्माण करण्याचे ठरवले,वर्गणी जमा केली,आणि गायरान,पडीत जमिनीत एक ट्रॅक निर्माण केला.व्हॉलीबॉल,रस्सी,कसरती,धावणे,अश्या कृती होऊ लागल्या.
आज रोजी या ग्रुप चे अनेक स्वप्ने असून गाव कसे पुढे जाईल. यावर हा ग्रुप काम करत आहे,घर घर सरकारी कर्मचारी,असे या ग्रुप चे ध्येय असून एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ अश्या उक्तीप्रमाणे हा ग्रुप काम करत आहे.गावाशी नाळ जोडून राहीली पाहिजे.आपली ओळख गावापासून असते,गावचा विकास तो सर्वांचा विकास,असे या ग्रुप चे मत असून पुढे प्राथमिक शिक्षण कसे दर्जेदार देता येईल,शाळेची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी हा ग्रुप काम करणार आहे. हेल्पिंग हॅण्ड ग्रुप, कुंभेफळ च्या या स्तुत्य उपक्रम चे सर्वत्र कौतुक होत आहे.