Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक वृक्ष स्वतःहाच्या आयुष्यासाठी जतन करा – सभापती समाधान शिंगणे 

छत्रपती अर्बनच्या वतीने वृक्ष लागवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

       मागील बऱ्याच वर्षांपासून परिसरात वृक्ष लागवडी पेक्षा वृक्ष तोडीचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.यामुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस समतोल बिघडत चाललेला आहे.या बेभान वृक्षतोडीमुळे मानवी जीवनावर देखील मोठा परिणाम होतांना दिसायला सुरुवात झाली आहे.आता एक वृक्ष स्वतःहाच्या आयुष्यासाठी लागवड करून ते जतन करा असे प्रतिपादन देऊळगांव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी केले.

छत्रपती अर्बन पतसंस्थेच्या वतीने संचालक वसुदेव पाटील शिंगणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंदू स्मशानभूमीत वृक्ष लागवड करण्यात आली.याप्रसंगी जेष्ठ नेते राजेंद्र डुंगरवाल, खडकपूर्णा अर्बनचे अध्यक्ष संजय शिंगणे,माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. जे. पी. ताठे, संचालक एकनाथ शिंगणे,माजी सरपंच रतन रेशवाल, सुभाष शिंगणे, राजेंद्र आचलिया, राम प-हाड, पुरूषोत्तम खंदारकर, धर्मराज खिल्लारे,फरीद कुरेशी,अशोक पाबळे,परशु शिंगणे, संजय खरात,सुनिल महाराज शिंगणे, अमोल बोबडे, पुरुषोत्तम शिंगणे,सचिन आंधळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना सभापती शिंगणे म्हणाले की,

यंदा उन्हाळ्यात तापमानाने चांगलाच उंचाक गाढला होता.42 % सेली अंश डिग्री पेक्षा वाढलेले तापमान खऱ्या अर्थाने पर्यावरणाची व वृक्ष लागवडीचे महत्व सांगून गेले यामुळे पावसाळ्यात सर्वाधिक वृक्षारोपण करावे असे आवाहान देखील केले. यावेळी विविध जातींचे असंख्य वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापक नितीन खिल्लारे, संतोष चेके, शिवप्रसाद प-हाड, रविंद्र पान्नासे अमोल गुरव, रघु शिंगणे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये