Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हवामान बदल परिस्थीतीचा आढावा – प्रक्रीया करूणच बियाणे पेरणी

एकगाव एकवाण कापूस लागवड चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

         महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील मा बाळासाहेब ठाकरे ग्राम परिवर्तन (स्मार्ट )प्रकल्पांतर्गत कापूस मूल्यवर्धन साखळी व शेतकऱ्यांना शेती विषयक नवीन तंत्रज्ञान पीक व लागवड पद्धती प्रक्रिया प्रत्यक्ष करून कोरपणा तालुक्यातील चनई ( बु )येथे गावकरी शेतकरी ग्रामपंचायत पदाधिकारी महिला गट यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमांमध्ये एक गाव एक वान कापूस लागवड कार्यक्रम तालुक्यातील वीस गावाची निवड करून एक वाण उत्पादनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे व प्रक्रिया करून दर्जेदार उत्पादन घेऊन बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळवून देणे हा उद्देश ठेवून शासनाने हा कार्यक्रम राबविण्याची सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांशी गाव पातळीवर संवाद सभेचे आयोजन करून मार्गदर्शन व शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी चर्चा केल्या जात आहे.

कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक कु सुप्रिया कदम सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी संचालक स आबिद अली अबुंजाचे क्षेत्र अधिकारी संतोष आकेवार यांनी दर्जेदार उत्पादण ज्यादा भावासाठी प्रक्रीया करूण कापूस विक्री व बियाणे उगवण क्षमता या सह बियाणे पेरणी च्या वेळी करावयाचे प्रक्रीया बाबत माहीती दिली जमीनीची सुपीकता टिकवणे व जमीनीला आवश्यक अन्नद्रव्ये या करीता जमीन तपासणी आरोग्य प्रत्रिक प्रयोग शाळेतुन प्राप्त करणे आवश्यक आहे जमिनीची सुपीकता व पर्यावरणाचा समतोल राखण्या साठी रो ह यो अंतर्गत फळबाग बांबु लागवड व जमिनीची धूप कमी व मशागत सुपिकता टिकविण्या साठी जलसंधारण जमीन सुधारणा कार्यकम गावकरी व शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी सि आर पी योगीता देवतळे शशीकला मडावी संगीता देवतळे सुलभा सिडाम आनंदराव मडावी वामन जिवने मडपाती यांचे सह नागरीक उपस्थीत होते गावातील ३० शेतकऱ्याची कापूस लागवड साठी निवड करण्यात आली गटप्रमुख निवड करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये