Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ढकलढुकल करुन मारहाण करून जखमी प्रकरण

आरोपीवर गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 17/06/2024 रोजी आरोपी नामे हर्शल नेहारे, रा. करंजी काजी याच्या ताब्यात पिस्तूल असल्याची माहिती प्राप्त झाली होती व नमूद आरोपी याने गावात पिस्टल ने गोळी घालून मारण्याची धमकी दिली होती पो स्टे सेवाग्राम येथील psi कदम व पो.स्टाफ ना.पो.शि. संजय लाडे, ब.नं. 1484, व चालक म.पो. अंमलदार कोमल ब.नं. 467 शासकीय वाहनाने करंजी काजी येथे गेले असता, हर्शल नेहारे हा घरी हजर मिळुन आला व तो पोलीसांना पाहुन हातपाय जमिनीवर आपटुन पोलीसांना जोरजोराने शिवीगाळ करु लागला.

पो.उप.नि. शिवराज कदम यांनी त्याला शांत राहण्याची समज दिली असता, त्याने पो.उप.नि. षिवराज कदम यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली व पो.उप.नि. कदम यांना ढकल-ढुकल करुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यास पाठलाग करुन त्याला पकडले असता, त्याने पो.उप.नि. शिवराज कदम यांच्या वर हमला करून लाथा बुक्क्या नी मारहाण केली त्यांना जखमी केले. तसेच अश्लील भाषेत शिवीगाळ केली. हर्शल नेहारे यास सोबत असलेल्या पो.स्टाफच्या मदतीने त्यास ताब्यात घेवुन पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या कमरेमध्ये एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र मिळुन आले. ते पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करुन आरोपीसह ताब्यात घेतले.

पोलीस स्टेशनला परत येवुन नमुद आरोपी हर्शल घनश्याम नेहारे, वय 21 वर्ष, रा. करंजी काजी, ता. जि. वर्धा याने पो.उप.नि. शिवराज कदम हे पो.स्टाफ सह शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, त्यांना ढकलढुकल करुन लाथा बुक्यानी मारहाण करून जखमी केले. तसेच आरोपीचे अंगझडतीत अग्निशस्त्र मिळुन आल्याने पो.उप.नि. शिवराज कदम, पो.स्टे. सेवाग्राम यांच्या लेखी तक्रारीवरुन अप. क्र. 457/2024 कलम 353, 332, 294, 506 भा.दं.वि. सहकलम 3, 25 भा.ह.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास पो.उप.नि. वसंत शुक्ला, पो.स्टे. सेवाग्राम हे करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये