समतोल व रचनात्मक विकासदृष्टी असलेल्या भाजपा महायुतीला महापालिकेची सत्ता सोपवा – हंसराज अहीर

चांदा ब्लास्ट
शहराच्या विकासामध्ये भाजपा लोकप्रतिनिधींचे मोठे योगदान आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेवर आल्यानंतर भाजपा नगरसेवकांनी सापत्नभाव न ठेवता शहरात विकासाची अनेक कामे केली आहेत. पदावर नसतांनाही गेली 3-4 वर्ष लोकांशी संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भाजपा नगरसेवकांनी केला. कोविड काळामध्ये रूग्णांच्या सेवेत कार्य केले आहे. राजकारणातून समाजकारण हा भाजपा कार्यकर्त्यांचा पिंड असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेत पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना महायुतीच्या हाती सत्ता सोपविण्याचे आवाहन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी विविध प्रभागात महायुती उमेदवारांच्या प्रचार सभेत व पदयात्रेतून केले आहे.
महाराष्ट्रात भाजप महायुतीची सत्ता असल्याने चंद्रपूर महानगराचा विकास प्रशस्त होईल असे सांगत राज्य सरकार चंद्रपूर शहराला नवी दिशा देण्यास कटीबध्द आहे. शहराच्या सर्वंकष व रचनात्मक विकासाकरिता पक्षाचे लोकप्रतिनिधी सकारात्मक भुमिकेतून कार्य करीत असल्याने त्यांच्या माध्यमातूनही चंद्रपूर विकासाच्या दिशेने मोठी झेप घेणार असल्याने चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना निवडूण देण्याची जबाबदारी वाढली असल्याने मतदारांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावून भाजपाचा झेंडा चंद्रपूर महापालिकेत फडकवावा असे आवाहनही अहीर यांनी प्रचार मोहिमेतून केले आहे.
भाजप महायुतीच्या प्रचार रॅलीस नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद
दि. 11 जानेवारी 2026 रोजी भाजप नेते हंसराज अहीर, आमदार किशोर जोरगेवार व उमरखेडचे आमदार विजय खडसे, युवा नेते रघुवीर अहीर, भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिर व एकोरी प्रभागात प्रचार रॅलीत सहभागी होऊन महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या रॅलीला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याची ग्वाही दिली.



