ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माळी समाजच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
क्रांतीज्योती सत्यशोधक माळी समाज मंडळ गडचांदूरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 16 जून ला घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नानाजी पाटील आदे होते. अध्यक्षस्थानी श्री पुंडलिकराव वाडई होते. उद्घाटक श्री अभिजीत मोहुर्ले होते प्रमुख मार्गदर्शक संदीप आदे, श्री नंदू मोहूर्ले,मंगेश गुरनुले, रविभाऊ शेंडे शंकर निकुरे, आशिष मोहूर्ले,भीमराव कोठरंगे,होते. दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालक, व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.