शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी येथे “पारितोषिक वितरण समारंभ”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी येथील शासकीय तंत्रनिकेतन, ब्रम्हपुरी येथे ‘स्पंदन-२०२६’ या दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नुकतेच अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या महोत्सवांतर्गत पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विशाल नितनवरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली तसेच विशेष अतिथी म्हणून प्रा. राजेंद्र राचलवार, संचालक, भागीरथी होंडा मोटर्स, ब्रम्हपुरी उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते संस्थांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. मार्गदर्शन करताना प्रा. नितनवरे यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याचे नमूद करून, केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते न थांबता क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वांगीण विकास साधावा, असा मौलिक संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजन वानखडे, प्रभारी प्राचार्य होते. व्यासपीठावर डॉ. आशिष बहेडवार, उपप्राचार्य, प्रा. इंद्रजीत सांगोळे, प्रभारी अधिकारी (स्पंदन-२०२६) यांच्यासह जिमखाना विद्यार्थी मंडळाचे साहिल पुठ्ठावार, ब्रम्हा चौधरी, आचल आकरे, मंथनी कोल्हे, गायत्री चतारे, कामेश्वरी धामोडकर, अभय जोगदंड, स्वयंम बोरकर, ज्ञानेश्वरी जिभकाटे, श्रीकांत ढोरे व रॉली नागोसे उपस्थित होते.
यावेळी विभागप्रमुख प्रा. जयंत बोरकर, प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. मीनाक्षी मानलवार, प्रा. नितीन डोरलीकर यांच्यासह अधिव्याख्याते, अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.



