देऊळगाव मही ते इसरुळ रस्त्याचे डांबरीकरण करा _ क्रांतिकारी शेतकरी संघटनाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव मही ते बायगाव खुर्द मार्गे इसरुळ पर्यंत च्या महत्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर बायगाव खुर्द, मंडपगाव, चिंचखेड, सुलतानपूर, आबावाडी, इसरुळ ही गावे आहेत.
प्रत्येक गावातील नागरिकांना दवाखाना, बी बियाणे, औषधी, किराणा व इतरही कामासाठी देऊळगाव मही बाजारपेठेत यावे लागते, विद्यार्थ्याचे सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे, खराब रस्त्यामुळे संपर्क तुटला आहे, गेल्या 10 वर्षांपासून या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्यावरून जाणारी चिखली ते संभाजी नगर बस सुद्धा खराब रस्त्यामुळे बंद पडली आहेत, या सर्व गावातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेती वरच अवलंबून आहे, त्यामुळे शेती माल बाजारपेठेत आणण्यास अडथळा येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत सदर रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने व नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगाव राजा यांना निवेदन देऊन दिला आहे. निवेदनावर मधुकर शिंगणे, गजानन वायाळ ,शेख जुल्फेकार शेख यासीन, यांच्या स्वाक्षऱ्या आहे.



