Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सालोरी येथे कृषी दुतांचे झाले आगमन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         महारोगी सेवा समिती द्वारा संचालित, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत सालोरी येथे शेतकऱ्यांचा मार्गदर्शनासाठी विद्यार्थीनी दाखल झाल्या. या वेळी गावाचे सरपंच प्रतिभा शेरकुरे , उपसरपंच गजानन देहारी व इतर ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली.यावेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी विद्यार्थीनींचे स्वागत केले.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ,शेती करतांना येणाऱ्या अडचणी यावर योग्य मार्गदर्शन मिळण्याकरिता ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आयोजित करण्यात आले.आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एस.पोतदार,कार्यक्रम प्रभारी डॉ आर.वी.महाजन,कार्यक्रम समन्वयक आर.वी.तायडे यांचे मार्गदर्शन लाभले.

शेतकऱ्यांचा मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमामध्ये सालोरी येथे कृषी कन्या वैष्णवी कोरडे, तनया महल्ले, मिताली झाडे,पुनम लुचे, मिनल खिरटकर, रूचिता कुंभारे, निकिता लाहोरे यांचा समावेश होता. यासोबतच इतर ग्रामस्थांनी व शेतकरीही उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये