Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्रात भव्य रोगनिदान शिबिर

जागतिक पर्यावरण दिन व महानिर्मितीच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

चांदा ब्लास्ट

२९२० मे.वॅ. स्थापित क्षमता असलेले महानिर्मितीचे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वीज निर्मिती क्षेत्रात नेहमीच महत्वाची व उल्लेखनीय कामगिरी करत असते. वीज निर्मिती करतांनाच येथील कर्मचारी व उर्जानगर वसाहतीमधील रहिवासी यांच्या आरोग्याप्रती देखील जागरूक आहे. जागतिक पर्यावरण दिन व महानिर्मितीच्या १९ व्या वर्धापण दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात भव्य रोग निदान शिबिराचे यशस्विपणे दिनांक ०६.०६.०२०२४ रोजी स्नेहबंध सभागृह येथे आयोजन करण्यात आले. सदर रोग निदान शिबिर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशन व टाटा कॅन्सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.

या रोगनिदान शिबिरामध्ये कान, नाक, घसा रोग, स्त्री रोग, छाती रोग, त्वचारोग, सामान्य रोग, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांच्यासह ब्लड शुगर व प्रेशर तपासणी, लिव्हर फंक्शन टेस्ट, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, बोन डेंसिटी टेस्ट यांची तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषण करतांना चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. गिरीश कुमरवार यांनी सर्व डॉक्टर व त्यांच्या चमू चे धन्यवाद व्यक्त केले व वेळोवेळी अश्याच रोगनिदान शिबिराच्या आयोजनाचा मानस व्यक्त केला तर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांनी चं.म.औ.वि. केंद्राचे कुटुंबप्रमुख श्री. गिरिश कुमरवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अभिनंदन केले.

या शिबिराचे उद्घाटन डॉ. भुषण शिंदे, उपमुख्य अभियंता (प्रशासन) यांनी केले व श्री. शाम राठोड, उपमुख्य अभियंता (को.हा.वि.) तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व उर्जानगरवासी यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे संचालन चं.म.औ.वि. केंद्राच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. संगीता बोधलकर यांनी केले व आभार नरेंद्र रहाटे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष मुरसकर, आरिफ शेख, हेमंत गेडाम, सागर श्रेष्ठी, विशाल पवार, नरेश आडे, रुपेश ताकसांडे तसेच सर्व डॉक्टर व त्यांच्या चमूने अथक परिश्रम घेवून भव्य रोगनिदान शिबिर यशस्वी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये