Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रात्रौ दारू विकताना दारू साठा जप्त

दारू विक्रेता महिलावर गुन्हा दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :-पोलीस निरीक्षक असिफराजा शेख शहरातील अवेद्ध व्यवसाय व गुन्हेगारीवर अंकुश लावण्या करिता रात्रौ गस्त वाढविण्यात आली आहे. पोलीस रात्रौ गस्त करतांना माहिती मिळाली की डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड इथे जुगार चालू आहे करिता गेले असता तिथे शहरातील वाईन शॉप बंद झाल्या नंतर ही दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली असता रात्रौ 11वा. आरोपी अर्चना प्रमोद राऊत (35)चा घरी छापा टाकून झडती घेतली असता 7000 की, चे दोन काळ्या स्कूल बॅग मध्ये 200 नग देशी दारूचे प्लास्टिक बॉटल व दोन स्कूल बॅग मध्ये रॉयल स्टेग व्हिस्की विदेशी दारूचे दोन लिटर प्रत्येकी 12 नग अंदाजे की 22, 200रु किमतीचे असे एकूण 29,200 रु चा दारू साठा जप्त करून आरोपी अर्चना प्रमोद राऊत (35)रा. डॉ.राजेंद्र प्रसाद वॉर्ड यांचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे राजुरा यांचा मार्गदर्शनातं पोलीस निरीक्षक असिफराजा बी शेख,गजानन डोईफोडे, रणवीजय ठाकूर, पुरोषोत्तम चिकाटे, वशिष्ट रंगारी, शरदचंद्र कारुख, मिलिंद आत्राम, शेखर माथानकर, व महिला मपोअ, सीमा पोरते इ, स्टॉप यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये