ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पळसगावात सस्याची शिकार

७ आरोपींना अटक 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- दिनांक 05.06.2024 रोजी नियतक्षेत्र कळमणा अंतर्गत येत असलेल्या मौजा पळसगांव तेंदु गोडावुन परिसरात सस्यांची वाघरी लावुन शिकार होत असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली. माहितीचे आधारे पळसगांव येथील तेंदु गोडावुन मागील परिसरात सापडा रचुन आरोपी नामे दिलीप रामा मेश्राम, वय 37 वर्षे, रा.गोंगले, तह. सडक अर्जुनी, जि. गोंदिया, राजु काशीराम मेश्राम, वय 39 वर्षे, रा.उमरी, तह.साकोली, जि. भंडारा, भोजराम शंकर कोल्हे, वय 34 वर्षे, रा.सोंदळ, तह.सडक अर्जुनी, जि.गोंदिया, विनोद रामकृष्ण वेंडवार, वय 42 वर्षे, रा.सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि. गोंदिया, सुभाष वासुदेव चन्ने, वय 44 वर्षे, रा. सोंदळ, तह. सडक अर्जुनी, जि.गोंदिया, पुरुषोत्तम मोतीराम वलथरे, वय 45 वर्षे, रा. किन्ही, तह. साकोली, जि. भंडारा, फागु पांडुरंग शेन्डे, वय 50 वर्षे, रा. किन्ही, तह. साकोली, जि. भंडारा यांना एक जिवंत ससा (जखमी अवस्थेत) व वन्यप्राणी शिकारीचे फासे सह ताब्यात घेतले व जखमी सस्याला उपचारा करीता वन्यजीव उपचार केन्द्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे पाठविण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान सदर ससा दिनांक 06.06.2024 ला मृत पावला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये