Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अमेया स्केटिंग अकादमी चंद्रपूरचे घवघवीत यश

सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह 13 पदके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 नागपूर महानगरपालिकेच्या नंदनवन येथील नुकत्याच स्केटिंग मैदानावर आयोजित स्केटिंग स्पर्धेत अमेया स्केटिंग अकादमी चंद्रपूर च्या स्केटिंग पटूंनी उत्कृष्ट कामगिरी करत १३ पदके जिंकली.

इंडियन स्केटिंग अकादमी स्केटर रेस नागपूरच्या वतीने आयोजित या स्पर्धेत नागपूर शहर आणि चंद्रपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, नाशिक, संभाजीनगर येथील 500 हून अधिक स्केटर्सनी सहभाग घेतला होता. अमेया स्केटिंग अकादमीच्या सर्व 13 स्केटर्सनी उत्कृष्ट कामगिरी केली आणि 13 पदके मिळवली.

समीर धुर्वे, पल्लव थेरे, मंथन बुलबुले, रुद्र कुळमेथे, धेरया वारफडे, भार्गव, दिवंयाश, नैतिक प्रजापती,कार्तिक ठक्कर, तश् अरोरा,प्रीस राम, राष्ट्रीय स्केटर आणि प्रशिक्षक आतिश धुर्वे (मायकेल) आणि सहाय्यक प्रशिक्षक वैभव धुर्वे हे सर्व स्केटर्सना अमेया स्केटिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. ते त्याच्या यशाचे श्रेय त्याचे पालक आणि प्रशिक्षक आतिश धुर्वे (मायकेल सर) यांना देते.

सर्व स्केटर्स आणि प्रशिक्षक (मायकेल सर) यांचे चंद्रपूरवासीयांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये