शेती काम चालू असताना विद्युत प्रवाह जमिनीत उतरला
शेतकऱ्याची बैल जोडी जागीच गतप्राण
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
ग्रामीण भागामध्ये पावसाळ्याचे दिवस तोंडावर आलेले असताना रब्बी हंगामाच्या पूर्व शेती मशागतीला वेग आला असून तालुक्यातील तुळजापूर येथे शेताची वखरणी सुरू असताना शेतातून गेलेला विद्युत प्रवाह खांबामधून जमिनीत आलेला असताना सदर विद्युत प्रवाहाच्या खांबा जवळून जात असताना वखराला त्याचा विद्युत प्रवाह लागला आणि शेतकऱ्याचे एक लाख दहा हजाराचे पशुधन जाग्यावर गतपण झाल्याची घटना दिनांक चार रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घडली
सविस्तर वृत्त असे की मान्सूनची चाहूल लागताच रब्बी हंगामाच्या पूर्व मशागतीला ग्रामीण भागामध्ये वेग आला असून आपली जमीन पेरणी योग्य करण्यास मग्न झालेला आहे अशातच घटनेच्या दिवशी देऊळगाव राजा तालुक्यातील मौजे तुळजापूर येथील शेतकरी सचिन एकनाथ कोल्हे त्यांच्या लगत असलेल्या गुलाबराव बाजीराव कोल्हे यांच्या शेतामध्ये गट क्रमांक 169 मध्ये वखरणी करत होते घटनेच्या दिवशी सकाळी दहाच्या दरम्यान लोखंडी विद्युत खांबातून विद्युत प्रवाह थेट जमिनीत उतरलेला असताना वखर सदर खांबाजवळ जात असताना विद्युत खांबाला वखराच्या समोरच्या भागाचा स्पर्श झाला त्यामध्ये शेती कामासाठी नव्यानेच घेतलेली बैल जोडी (किंमत एक लाख दहा हजार ) विद्युत प्रवाहमुळे जागेवर गतप्राण झाली. तर सचिन कोल्हे जखमी झाले घटनेची माहिती मिळतात महावितरण चे सहाय्यक अभियंता रवी खरात यांनी पाहणी करून सदर बैल जोडी शेव विच्छेदन साठी अहवाल तयार करून पाठविला दरम्यान महसूल विभागाचे तुळजापूर येथील तलाठी पंढरी जायभाये, संजय बरांडे यांनी पंचनामा करून महसूल विभागाला अहवाल सादर केला आहे.
शेती कामासाठी सदर युवा शेतकऱ्यांना काही दिवसांपूर्वी सदर बैल जोडी खरेदी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे दोन्ही बैल जाग्यावर ठार झाल्याने सदर युवा शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून सदर शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.