ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सव तसेच येणारे उत्सव एकोप्याने व शांततेत साजरा करा _ जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गणेशोत्सव सह येणारे राष्ट्रीय सण समजून एकोप्याने व शांततेत साजरे करावे, शांतता समितीच्या सदस्यांनी युवा पिढीला मोबाईल वर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यास मनाई करावी, गणेश मंडळांनी पोलिस प्रशासन च्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यसनमुक्ती समाज जागृती, यासह विविध आयोजित धार्मिक कार्यक्रमासह समाज जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करावे जेणेकरून व्यसनाधीन होणारी युवा पिढी त्यापासून परावृत्त होईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी देऊळगाव राजा येथे 9 सप्टेंबर रोजी स्थानिक नगर परिषद टाऊन हॉल येथे आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.

जिल्हा पोलिस उप अधीक्षक अमोल गायकवाड यांनी गणेश मंडळांनी डीजे ऐवजी पारंपरिक बँड ढोल ताशे चा वापर केल्यास ध्वनी प्रदूषण होणार नाही, जेष्ठ नागरिकांना लहान मुलांना, रुग्णांना त्रास होणार नाही असे सांगितले, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे यांनीही सन उत्सव साजरे करताना शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगीप्रमुख प्रामुख्याने पोलीस उपविभागीय अधिकारी अर्जुना ठोसरे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्कर गे, महावितरण उप कार्यकारी अभियंता नागरे , वैद्यकीय अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी यांच्यासह माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, गणेश मांटे, प्रकाश गिते,प्रवीण गिते, धनसिंग शिपने, सेवा निवृत्त मुख्याधापक प्रकाश खांडेभराड, यांच्यासह शहरातील प्रमुख संघटनेचे पदाधिकारी आणिइतर

शांतता समितीच्या सदस्यांनी बैठकीत सूचना केल्या, पत्रकार सूरज गुप्ता यांनी गणेशोत्सव दरम्यान प्रत्येक अधिकाऱ्यांनी कोणतेही एक मंडळ दत्तक घ्यावे अशी सूचना केली. सभेला देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, दुसरबीड, अंढेरा येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटना चे नेते, कार्यकर्ते, व पत्रकार उपस्थित होते,

सभेचे संचालन व आभार प्रदर्शन पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये