शक्तीपेक्षा युक्ती भारी! अभिजित वंजारींच्या विजयाने काँग्रेसचा जल्लोष : भद्रावती भव्य रॅली
अटीतटीच्या पदवीधर निवडणुकीत भाजपचे सुधाकर कोहळे यांना धक्का

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यावर मात करीत विजय मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर भद्रावतीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सुरुवातीलाभाजपाचे सुधाकर कोहळे यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली जात असताना अखेरच्या टप्प्यात निकालाचे चित्र बदलल्याने ही लढत विशेष चर्चेची ठरली. या निकालातून ‘शक्तीपेक्षा युक्ती महत्त्वाची’ हा संदेश अधोरेखित झाल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
पदवीधर निवडणुकीतील ही लढत सुरुवातीपासूनच चुरशीची आणि अटीतटीची होती. दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जात असताना अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा कायम राहिली. निवडणुकीच्या मैदानात केवळ राजकीय ताकद नव्हे, तर रणनीती, मतदारांशी संपर्क आणि योग्य वेळी केलेली खेळीही महत्त्वाची ठरते, याची प्रचिती या लढतीतून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
अपक्ष नितेश कराळे यांनी इतर उमेदवारांना इतर उमेदवारांसमोर आश्चर्यकारक आव्हान उभे केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीतील चुरस अधिक वाढली होती.विजयासाठी केवळ शक्ती पुरेशी नसून युक्तीची जोडही आवश्यक असते, हा मुद्दा या निकालाच्या निमित्ताने पुढे आला.
ॲड. अभिजित वंजारी यांच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर भद्रावती येथे बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर काँग्रेस कार्यालयात विजयी सभा पार पडली.
खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते प्रवीण काकडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष सुमित मुडेवार आणि शहराध्यक्ष भूपेश कायरकर यांच्या नेतृत्वात हा जल्लोष आयोजित करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते धनंजय गुंडावार, विजय भोयर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार, सूरज गावंडे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, नगरसेवक अनिल पडोळे, प्रथम गेडाम, संदीप चटपकर, अमोल दौलतकर, रितेश वाढई, गंगाधर गेडाम, आशिष देहारकर, साहिल डोंगे, विनोद मुडपल्लीवार, दीपंकर शहा, सचिन पचारे, गटनेत्या सरिता सूर, नगरसेविका उषा जाधव, अर्पणा सातपुते, सुनीता खंडाळकर, कविता सुफी, ज्योती मोरे आदी उपस्थित होते.
पदवीधर निवडणुकीच्या या निकालाने भद्रावतीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विजयाचा जल्लोष स्थानिक राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे.



