मूकबधिर विद्यार्थ्यांच्या सहवासात वाढदिवसाचा आनंदोत्सव..!
युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विपीन पेद्दूलवार यांची सामाजिक बांधिलकी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ अनेक जन आपला वाढदिवस आपल्या कुटुंबासह साजरा करतांना मौजमजा करतात, पैसे उधळतात. पण आपल्या आनंदाचा हा क्षण अनेकांना आनंदाची अनुभूती देणारा ठरावा असा विचार करणारी काही मोजकीच मंडळी बघायला मिळतात. भंगाराम तळोधी येथील युवा उद्योजक तथा युवक काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विपीन पेद्दूलवार यांनी आपला वाढदिवस चिमूकल्यांसोबत साजरा केला. मूक बधिर विध्यार्थी मंडळींना आनंदाचा सहवास दिला. चिमुकल्यांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. सोबत त्यांनी पेन, पुस्तक, फळे व इतर साहित्य देत सामाजिक बांधिलकी जोपासली.
यानंतर गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूस करीत त्यांना विविध प्रकाराची फळ दिलीत. सायंकाळी भंगाराम तळोधी येथील युवकांनी आपल्या आवडत्या युवा नेत्याचा वाढदिवस अतिशय आनंदपूर्ण वातावरणात साजरा केला.
मूकबधिर विद्यालय आणि ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथील कार्यक्रमप्रसंगी काँग्रेस चे वरिष्ठ नेते अजय माडूरवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीनिवास कंदनूरीवर, काँग्रेसचे वरिष्ठ नेते देवेंद्र बट्टे, शहराध्यक्ष राजू झाडे, तुकाराम झाडे, देविदास सातपुते, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष सारनाथ बक्षी, वनिता वाघाडे, पायल दुर्गे, राजू राऊत, विनोद नागापूरे, आशिष निमगडे, बबलू कुडमेथे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भंगाराम तळोधी येथे देखील मित्र मंडळी यांच्या वतीने सायंकाळी विपीन यांचा वाढदिवस अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गौरव गोनपल्लीवार, सागर कंदनूरीवार, बजरंगीलाल पेद्दूलवार, समीर येग्गेवर, संकेत गुरनुले, आदित्य कोलूरवार, सुरज खर्डीवार, स्वामी जंगपल्लीवार, मारोती भोयर, कृष्णा पेनगोंडावार, प्रशांत कळांबे यांची उपस्थिती होती.



