Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे नवनियुक्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी पदभार स्वीकारला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे नवनियुक्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य साईनाथ मेश्राम यांनी पदभार सेवानिवृत्त प्राचार्य सौ स्मिता ताई चिताडे यांच्याकडून 1जून ला स्वीकारला, याप्रसंगी संस्थेचे सचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, उपमुख्याध्यापक अनिल काकडे, तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

मनमिळावू व शांत स्वभाव असलेले साईनाथ मेश्राम यापूर्वी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव सूर्याचा येथे मुख्याध्यापक तथा प्राचार्य पदी कार्यरत होते.

प्राचार्य साईनाथ मेश्राम यांचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये