ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपअधीक्षक रचना जाधव यांच्या नेतृत्वात भूमी अभिलेख कार्यालयाची उत्तम कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेडराजा : भूमी अभिलेख कार्यालय, सिंदखेडराजा येथे रचना जाधव यांनी उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयीन कामकाजात सकारात्मक बदल दिसून येत असून, नागरिकांच्या कामांना गती मिळाली आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वय ठेवून विविध प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

नागरिकांना शासकीय सेवा व भूमी अभिलेख विषयक कामांसाठी अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी कार्यालयीन कामकाज अधिक शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविले जात आहे. प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची भूमिका उपअधीक्षक रचना जाधव यांनी घेतली आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहून जबाबदारीने कामकाज पार पाडत आहेत. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात असल्याने कार्यालयाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यक्षमता, शिस्त, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा या बाबींना प्राधान्य देत उपअधीक्षक रचना जाधव यांच्या नेतृत्वाखाली भूमी अभिलेख कार्यालय सिंदखेडराजा उत्तम कामगिरीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये